पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे असं मी मानतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ज्या गायींचा मृत्यू झाला ते मृत्यू हे हत्याकांडच आहे असं मी मानतो असंही राऊत म्हणाले आहेत. एवढंच काय जर आत्ता मिंधे आणि भाजपाचं राज्य नसतं तर केवढा गहजब झाला असता. हिंदू रक्षा मोर्चा, गो माता बचाओ चा मोर्चा निघाला असता. मात्र कोल्हापुरात झालेल्या गायींच्या मृत्यूंनंतर काहीही झालं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी गायींना चारा खाऊ घातला होता

कोल्हापूरमधल्या कणेरी मठात मुख्यमंत्री गेले होते, त्यांनी हाताने चारा गायींना खाऊ लागला. त्यानंतर या गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मी काही कुणावर आरोप करत नाही. या घटनेत ५० गायींचा मृत्यू झाला. पालघरच्या साधूंचं हत्याकांड आणि गायींचं हत्याकांड हे मी सारखंच मानतो. या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मिंधे गटासारखे चोर लफंगे आम्ही नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. डुप्लिकेट शिवसेनेने आम्हाला पदावरून काढून टाकलं तरी काही फरक पडत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on Anil Deshmukh attack
Sanjay Raut : “आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना…”, अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांना संशय
parinay fuke on anil deshmukh
“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Live : “अनिल देशमुखांवर हल्ला होत असताना भाजपाच्या नावाने घोषणा”, संजय राऊतांचा दावा
Eknath Shinde
Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
Nagpur Rural SP Harsh Poddar
Anil Deshmukh Injured: अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “घटनेमागील तथ्य…”
vidhan sabha candidate criminal cases
यंदा २९ टक्के उमेदवारांवर गुन्हे; ३८ टक्के करोडपती
Sharad Pawar On Anil Deshmukh Attack
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही प्रवृत्तींना…”
Attack on Anil Deshmukh, Supriya Sule First Reaction
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मास्टरमाईंड..”

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे. देशामध्ये अलीकडे गाय, गोमाता या संकल्पनेला महत्त्व दिले जात असताना हिंदुत्वाशी जवळीकीचे नाते सांगणाऱ्या कणेरी मठात रातोरात ५० हून अधिक देशी गाईंचा मृत्यू झाल्याने विविध अंगांनी चर्चा रंगते आहे. मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची कार्यशैली, राजकीय नातेसंबंध हे विषयही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत अशातच संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला आहे आता यावर सरकार काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पालघरचं हत्याकांड काय आहे?

१६ एप्रिल २०२२ च्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.