पंढरपूर: सावळ्या विठुरायाच्या आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता २४ तास उभा राहणार आहे. दि ७ जुलै ते २६ जुलैपर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन २४ तास राहणार आहे. देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली . दरम्यान, आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे.

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून देव २४ तास उभा असतो. या कालवधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्याआधी विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे . विठ्ठलाच्या व रुक्मिणीमातेच्या पाठी मऊ कापसाचा लोड ठेवण्यात आला आहे. जेणेकरून देवाला शीणवठा येणार नाही अशी भावना वारकरी संप्रदायाची आहे. देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा : राज्यातील ओबीसी-मराठा वादावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर आरक्षणाठी…”

असे असतील विठुरायाचे नित्यक्रम

पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल. यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे.

Story img Loader