महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून एक महिना होऊन गेला आहे. आता चर्चा सुरु झाली आहे ती विधानसभा निवडणुकीची. विधानसभा निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. तर कालच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात आता आपल्याला बेसावध राहून चालणार नाही असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग वाढणार का? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचं कारण भगीरथ भालकेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं ?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी नुकतंच शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या घरवापसाचीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भरत भालके यांचे पुत्र आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात जी पोटनिवडणूक पार पडली त्यात १ लाख ५ हजार मतं ही भगीरथ भालकेंना पडली होती पण त्यांचा पराभव झाल्याने ते नाराज झाले होते. ज्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. आज गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. ज्यानंतर भगीरथ भालके राष्ट्रवादीत परतणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”

भगीरथ भालकेंनी गोविंदबागेत घेतली शरद पवारांची भेट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सध्या गोविंदबागेत अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच आता भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या भेटीनंतर विविध चर्चांनाही उधाण आले आहे. तसंच जर भगीरथ भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असतील तर पंढरपुरात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल, असे बोललं जातं आहे.

हे पण वाचा- सोलापूर: भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

कोण आहेत भगीरथ भालके?

भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र आहेत. भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. यावेळी भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके चेअरमन झाले. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व १८ संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती. भगीरथ भालके हे मागील दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur bharat bhalke son bhagirath bhalke meet sharad pawar before vidhansabha election scj
Show comments