पंढरपूर : ज्या दिवसाची वाट गेले काही दिवस वारकरी बघत होते.तो सोनियाचा दिन आला आहे. दशमीला म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीत भक्तांची मांदियाळी फ्व्यास मिळाली. यंदा विक्रमी भाविकांची गर्दी ,टाळ मृदुंगाचा जयघोष,भजन,हरिनामाचा गजराने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यास भाविकांना २० ते २२ तास लागत आहे. यंदा अनेक सोयी सुविधा रांगेत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, उद्या म्हणजे बुधवारी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा एकादशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी …प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे… या अभंगा प्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. एस टी, जादा रेल्वे तसेच खासगी वाहनातून भाविक मोठ्या संख्यने येत आहेत. त्याच बरोबरीने संतांच्या पालख्या सोबत देखील मोठ्या संख्येने भाविक आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीत जवळपास १२ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागा भाविकांनी फुल्ल झाली आहे. शहरातील मठ,धर्मशाळा या ठिकाणी भाविक मुक्कामी आहेत. तसेच रस्त्याकडेला राहुट्या , तंबू टाकून भाविक भजन, कीर्तन, हरिनामाचा जयघोष कानी पडत आहे. शहरातील लॉज ,भक्त निवास हे देखील हाऊसफुल्ल झाले आहेत. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.चंद्रभागा नदी, वाळवंट भाविकांची गर्दी दिसून येत आहे. नदीचे स्नान,भटक पुंडलिक मंदिराचे दर्शन घेवून भाविक दर्शन रांगेत उभा आहे.

हेही वाचा…“आमदार आणि इच्छुक उमेदवारांची आमच्याकडे…”, अनिल देशमुखांचा मोठा दावा

मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून पत्रा-शेड उभे केले आहेत. या शिवाय आरोग्य , पिण्याचे पाणी ,नाष्टा दिला जात आहे. तसेच राज्य सरकारच्या वतीने पिण्याच्या पाण्याची बाटली मोफत वाटप केले जात आहे . दर्शन रांगेत भाविकांना देवाचे थेट दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था केल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी “ माउली पथक “ पोलीस प्रशासनाने तैनात केले आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास रांगेत उभा होतो. मंगळवारी सकाळी ८ वाजता दर्शन दर्शन झाले. पावसाचा त्रास जाणवला नाही असे हिंगोली जिल्ह्यातील शशी चव्हाण या भाविकाने सांगितले. विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी म्हणजे उद्या एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. असे असले तरी लाखो भक्तांना पाहून विठ्ठल देखील सुखावला असे म्हंटल तर वावगे ठरणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur overflows with devotees for ashadhi ekadashi celebrations official maha puja by the chief minister eknath shinde psg
Show comments