पंढरपूर : भाविकांना दर्शन देण्यासाठी आता सावळा विठूराया २४ तास उभा राहणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे नवरात्र सुरु होत असल्याने परंपरे नुसार देवाचा चांदीचा पलंग काढून त्या पाल्नागाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच विठूराया आणि रुक्मिणीमातेला थकवा जाणू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावण्यात आला. याकाळात म्हणजेच ७ जुलै पर्यंत देवाचे २४ दर्शन तसेच सुरु राहणार असून व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना हजारो भाविकांनी पंढरी नगरी फुलून गेली आहे . संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या समीप आल्या आहेत. अशातच शेकडो वर्षाच्या परंपरे नुसार सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे काकडा आरती, पोशाख,भूपार्ती, शेजारती इत्यादी राजोपचार काही दिवसापुरते बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे .मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड समिती सदस्य शकुंतला नडगिरे,संभाजी शिंदे उपस्थित होते.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: “माझ्या सर्वेनुसार इम्तियाज जलील महाराष्ट्राचा सर्वात चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो”, वाचा कोण म्हणालं हे…!

अनेक भाविक पालखी बरोबर पायी चालत जाण्यापूर्वी देवाचे दर्शन करून दिंडीमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे पंढरी नगरीत भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेसाठी १५ लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. असे असले तरी सावळा विठूराया आता भाविकांना दर्शनासाठी २४ तास उभा राहिला आहे.

असे असतील विठुरायाचे नित्यक्रम

पहाटे चार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात १ तास दर्शन बंद असेल . यानंतर सकाळी १०,४५ ते ११ पर्यंत महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री साडे आठ ते ९ पर्यंत गंधाक्षता साठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे .