स्वच्छता, सुरक्षिततेवर भर, प्रशासनातर्फे अनेक उपक्रम

मंदार लोहोकरे, पंढरपूर</strong>

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आषाढी यात्रेला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे. या वर्षी प्रशासनाने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी दोन पूजा एकाच वेळी करण्यात येणार आहेत. निर्मल वारीअंतर्गत पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठांतील ३५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याबरोबर मोफत अन्नदान, स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम, गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा काम करणार आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि वारकऱ्यांना सुविधा देणाऱ्या पर्यावरणपूरक यात्रेचे नियोजन केल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत पंढरीची वारी करायची. कोणताही सांगावा नाही की आवाहन नाही. ठरलेल्या तिथीला पालखीसह पंढरीला प्रस्थान ठेवायचे. ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, रिंगण अशा शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी पंढरीला येतात. त्यांना सोयीसुविधा प्रशासन देते. मात्र अनेकदा गैरसोय, नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाईचा फटका वारकऱ्यांना बसत होता. दर वेळी पुढच्या वर्षी सुधारणा होईल, असे शासकीय उत्तर मिळत होते. मात्र यंदा त्याला पूर्णविराम मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून सर्वाना सर्व सोयीसुविधा मिळतील, याची दक्षता घेतली आहे.

पुणे येथील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर मेपासून वारीच्या तयारीला लागले होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्य़ांत बैठका, पालखी मार्गाची पाहणी, तेथील अडचणी, उपाययोजना आदींची माहिती घेतली. त्यांत अनेक बदल केले. विविध स्वयंसेवी संघटना, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठातील ‘एनएसएस’चे ३५ हजार विद्यार्थी, वारकरी यांचा सहभाग वारीत वाढवला. प्रथा, परंपरा याला धक्का न लावता आवश्यक ते बदल घडवून आणले. पालखीच्या मुक्कामी पूर्वी आणि नंतर स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, पोलीस बंदोबस्त, पाण्याचे पुरेसे टँकर, वैद्यकीय सेवा, वाहतुकीत बदल करण्यात आले.

यंदा वारीत..

’ पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत मुबलक पाणी असेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना

’ गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीचे व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित

’ एकादशीच्या दिवशी मंदिरातील नित्यपूजा आणि शासकीय महापूजा दोन्ही स्वतंत्र होत होत्या, त्या एकाच वेळी

’ दोन्ही एकाच वेळी होणार असल्याने दर्शनरांगेतील भाविकांच्या वेळेची बचत

’ यात्रेपूर्वी आणि यात्रेनंतर प्रशासनामार्फत विशेष स्वच्छतेची मोहीम

’ दर्शनरांगेतील भाविकांना मंदिर समितीतर्फे दशमी, एकादशी आणि द्वादशी या दिवशी खिचडी, उपवासाचे पदार्थ, पिण्याचे पाणी, चहा.

’ यात्राकाळात २१ आपत्ती, प्रतिसाद आणि मदत केंद्रे

तयारी पूर्ण!

यंदाच्या वारीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहर स्वच्छ राहावे यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संघटना, पालिकेचे १४०० कर्मचारी, मंदिर समितीचे २०० सफाई कर्मचारी मिळून शहराची स्वच्छता करणार आहेत. पालखी मुक्कामी आणि शहरात मुबलक पाण्याची सोय असेल. सीसीटीव्ही, वेब कॅमेरा, पोलीस यांच्या माध्यमांतून सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात येईल. वारकऱ्यांना विविध सोयी देणाऱ्या पर्यावरणपूरक यात्रेचे नियोजन केल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

भाविकांसाठी सोयीसुविधा

एस.टी. महामंडळाच्या ३५०० जादा बसगाडय़ा, यात्रा कालावधीसाठी चार बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ११ उपविभागीय अधिकारी, ४९ पोलीस निरीक्षक, २६०० पोलीस कर्मचारी, २०० होमगार्ड, बॉम्बशोधक-नाशक पथक आणि श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. मंदिर समितीने भाविकांना दर्शन मंडपात थेट दर्शन व्हावे, यासाठी ७ एलसीडी, तर शहरात १० एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. महिलांसाठी २० चेंजिंग रूमही उभारण्यात आल्या आहेत.

Story img Loader