प्रियदर्शनी फाऊंडेशनतर्फे पंडित नेहरू समाजरत्न पुरस्कार मुरुड नगरपरिषदेचे नगरसेवक संजय पांडुरंग गुंजाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मता राखण्याचे उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. संजय गुंजाळ यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. गेली २१ वर्षे कलासागर नाटय़ संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांनी यशस्वी काम केले आहे. सन २०११ चा ‘ॐ नम:शिवाय प्रतिष्ठान’चा ‘बाळशास्त्री जांभेकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे. सन २०१० ला रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा ‘सांस्कृतिक व कला पुरस्कार’प्राप्त आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राखतात. त्यांचे कार्य अलौकिक आहे. सदरील पुरस्कार त्यांना ७ डिसेंबर रोजी मुंबई येथे दिला जाणार आहे. या कार्यक्रमास आमदार नवाब मलीक, आमदार विद्याताई चव्हाण, कामगार नेते व आमदार भाई जगताप व मुंबई पोलीस सहायक आयुक्त धनराज वंजारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष सूरज भोईर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा