वसंत मुंडे

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बीडला ज्योती विनायक मेटे यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याच दिवशी फडणवीस यांचे खास दूत समजले जाणारे भाजपचे महामंत्री आमदार श्रीकांत भारतीय यांनी श्रीक्षेत्र भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेत प्रदीर्घ चर्चा केली. भाजपच्या पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या गैरहजेरीत फडणवीसांचा दौरा आणि आमदार भारतीय यांची गडावरील भेटीने भाजप अंतर्गत नेमके काय चालले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
bjp leader jagannath patil
“माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….

सामाजिक शक्तिस्थळ भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांनी भाषणबंदी केल्यानंतर पंकजा मुंडे गडापासून दूर झाल्या. या पाश्र्वभूमीवर मुंडेंच्या जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाने नव्या राजकीय समीकरणांची बांधणी सुरू केली आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांनी मुंडे भगिनी समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बीड जिल्हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. प्रदेश पातळीवर पक्षांतर्गत टोकाच्या स्पर्धेतही जिल्ह्यात प्रभाव आणि श्रीक्षेत्र भगवानगडाच्या माध्यमातून समाजावरील पकड कायम ठेवली होती. मुंडे यांच्यानंतर आठ वर्षांपूर्वी पक्षाची सूत्रे पंकजा यांच्याकडे आल्यानंतर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा केल्याने सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात नेतृत्वाचा संघर्ष पेटल्याचे अनेक घटनांवरून समोर आले. दरम्यान श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळाव्यात भाषणबंदी केल्यानंतर शास्त्री आणि पंकजा यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि पंकजा यांनी स्वतंत्र भगवान भक्तिगड स्थापन केला.

मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाच्याच नेत्यांनी विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप करत पराभवाचे खापर फडणवीसांच्या माथी मारले. तर इच्छा असतानाही विधान परिषदेवर ऐनवेळी पंकजा यांच्याऐवजी रमेश कराडांना तर केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. तेव्हापासून तर मुंडे भगिनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त असून त्यांचे समर्थक समाजमाध्यमातून फडणवीसांना लक्ष्य करतात. या पाश्र्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांनी बीडमध्ये ज्योती मेटे यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. तर भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी पाहुणचार घेत भाजपचे विद्यमान आमदार व काही पदाधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चाही केली. मात्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी व त्यांचे समर्थक अलिप्त राहिले.

दुसरीकडे त्याच दिवशी फडणवीस यांचे खास भाजपचे महामंत्री आमदार श्रीकांत भारतीय यांनी थेट भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेतले आणि प्रदीर्घ चर्चा केली. गडावरील विकासकामांची पाहणी करून शास्त्रींच्या कामाचे कौतुक केले. वारकरी संप्रदाय अत्यंत सोप्या पद्धतीने शास्त्री सांगतात. आपले कुटुंब वारकरी संप्रदायातील असल्याने अनेक वर्षांपासून गडावर येण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली असे श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.