Devendra Fadnavis And Pankaja Munde : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. यानंतर नुकतेच भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतरित कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंकजा मुंडे यांची पोस्ट

भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.”

विधानसभा लढवण्याची संधी हुकली

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे भाजपाच्या तिकिटावर बीडमधून लढल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पंकजा यांना भाजपाने संधी दिली आणि साडेचार वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा विधिमंडळात परतल्या.

दरम्यान बीडच्या परळी मतदारसंघातून आमदार राहिलेल्या पकंजा मुंडे यांना यंदा विधानसभा निवडणूक लढवता आली नव्हती. कारण दोन वर्षांपूर्वी महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) सहभागी झाल्याने यावेळी ही जागा त्यांना सुटली होती. राष्ट्रवादीचे (अजित पवार) धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार असल्याने, महायुतीतून तेच यावेळी परळीतून लढले आणि जिंकले.

हे ही वाचा : लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीसा; एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सरकार कोणावरही…”

मंत्रिमंडळात संधी मिळणार का?

विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने मंत्रिमंडळातही त्यांना जास्त जागा वाट्याला येणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या अनेकांनी मंत्रिमंळात संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. अशात यापूर्वीही मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा मंत्री होणार का, हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.