गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना किंवा जाहीर सभांमधून अशी वक्तव्ये केली ज्यावरून त्या पक्षाला इशारा देत असल्याचीही चर्चा झाली. याबाबत आता पंकजा मुंडेंनाच विचारण्यात आल्यावर त्यांनी हात जोडून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या मंगळवारी (२६ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “पक्ष फार मोठा आहे. माझ्या पक्षाचा नेता हा जगाचा नेता आहे. त्यांना इशारा द्यायची माझी काय औकात आहे. मी त्यांना इशारा देण्याची काहीही गरज नाही. मी कोणतेही इशारे देत नाही. माझी भाषणं समोर बसलेल्या लोकांसाठी असतात. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात काय बोलायचं हे मला अजूनही माहिती आहे. कुठे काय विषय आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी बोलत आहे.”

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

“स्वतःचा पाठिचा कणा आणि पिंड बदलून काम करण्यात काही अर्थ नसतो”

“आज माझ्याकडे कोणतंही संवैधानिक कोणतंही पद नाही. असं असताना माझी इतकी लोकप्रियता टिकून असेल, तर ती कशामुळे असेल. ही लोकप्रियता माझा शब्द लोकांना त्यांच्या मनातला वाटतो यामुळे आहे. ते मी सोडू शकत नाही. तो माझा मुख्य पिंड आहे. स्वतःचा पाठिचा कणा आणि पिंड बदलून कुठल्याही क्षेत्रात काम करण्यात काही अर्थ नसतो,” असं सूचक वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं.

“…म्हणून मी अस्वस्थ आहे”

भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? असं विचारलं असता पंकजा मुंडेंनी पुढे सांगितलं, “मी भाजपात अस्वस्थ नाही. मी सध्या सामान्यपणेच अस्वस्थ आहे. कारण माझ्या परिस्थितीत इतर कुणालाही ठेवलं तर तो माणूस अस्वस्थ होईलच किंवा तो आणखी काय करेल? हे माहीत नाही. पण मी कणखरपणे उभी आहे.”

हेही वाचा : “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा…

“मी अस्वस्थ असताना कोणाताही निर्णय घेत नाही. मी फार जड आत्मा आहे. मी पटकन डगमगणारी नाही. मी अस्वस्थ आहे, कारण एकाचवेळी मी खूप गोष्टींकडे लक्ष देत आहे. अगदी घरापासून व्यावसायिक गोष्टी, राजकारणाकडे लक्ष देत आहे. मी ‘वन मॅन आर्मी’ आहे, म्हणून मी अस्वस्थ आहे,” असं भाष्य पंकजा मुंडेंनी केलं.