बीडचे भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आठवडाभरापूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर बुधवारी (१९ ऑक्टोबर) भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भगीरथ बियाणी यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगीरथ बियाणी हे पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी आठवडाभरापूर्वी त्यांच्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घटनेला आठवडा झाला असता तरी बियाणी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

“एकही दिवस असा गेला नाही की भगीरथची आठवण आली नाही”

पंकजा मुंडे म्हणाले, “भगीरथ बियाणी माझा कार्यकर्ते नाही, तर घरातील सदस्य होता. त्याच्या जाण्याने आम्हाला खूप दुःख झालं. ही घटना घडली त्या दिवशी प्रीतम मुंडे बीडमध्ये होत्या, मात्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उज्जैनमधील कार्यक्रमात होते. त्या दिवशीपासून एकही दिवस असा गेला नाही की भगीरथची आठवण आली नाही.”

हेही वाचा : तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

“मी माझं व्हॉट्सअॅप दहावेळा उघडून बघत होते, कारण…”

“इथं येण्याआधीही मी माझं व्हॉट्सअॅप दहावेळा उघडून बघत होते. कारण त्याचा रोज मला काही ना काही मेसेज असायचा. कार्यकर्ते खूप जीव लावतात आणि अशी गोष्ट झाली की आमच्याही मनावर याचा खूप परिणाम होतो. माझ्या कुटुंबातील सदस्य केला आहे इतकं दुःख मला झालं आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde comment on suicide of her supporter bjp beed city president rno news pbs