भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सद्वारे माहिती दिली आहे.

एक्सवर पोस्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा treatment घ्यावी लागेल .. माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे … प्रवास करण्याची परवानगी नाही..” दुखापतीची माहिती देताच त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी यापुढे काळजी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
A Bengaluru man shared Diwali photos of women on social media without their consent and referred to the women as patakas
परवानगी न घेता महिलांचे फोटो केले शेअर, महिलांना संबोधले ‘पटाखा’; आक्षेपार्ह पोस्ट पाहून नेटकरी भडकले
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

दरम्यान, कालपासून पंकजा मुंडे चर्चेत आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने महाराष्ट्रातील सहा जागांवर राज्यसभेवर सदस्य पाठवण्यात येणार आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री व्ही. मुरलीधरन आणि वंदना चव्हाण या खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या जागी संबंधित पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे. तर, भाजपाकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा आहे.