मी निर्भीड आहे, माझ्या हावभावांमुळे मी आक्रमक वाटते. त्यामुळे ‘अँग्री यंग वुमन’ अशी प्रसारमाध्यमांत माझी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. २००९ मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने माझा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला, तेव्हा माझ्या बाबांना फार आनंद झाला होता. ते माझ्या आईला म्हणाले होते ‘बघ आपली पंकजा मोदींची स्टार प्रचारक आहे’. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली आणि माझा मंत्रिमंडळात समावेश होऊन ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली. मी मुंबईत लहानाची मोठी झालेली असल्यामुळे या खात्याला मी कसा न्याय देऊ शकेन, असे मला वाटत होते. पण मी झोकून देऊन काम केले. असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात केलं आहे. तसंच कार्यकर्ते नेत्यांना अडचणीत आणू शकतात असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपातील वरिष्ठांशी संघर्षाबाबतही वक्तव्य केलं आहे.
पाहा व्हिडीओ –