भाजपाच्या मराठवाडा विभागीय आढावा बैठकीस आज सकाळी दहा वाजता औरंगाबादमध्ये सुरूवात झाली. मात्र तोपर्यंत भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे बैठकीच्या ठिकाणी न आल्याने त्या या बैठकीस येणार की नाही? याबद्दल चर्चा सुरू होती. दरम्यान, दुपारी बैठक काही वेळासाठी थांबल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत, पंकजा मुंडे या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची बैठकीस अनुपस्थिती असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक व मराठवाडास्तरीय नेत्यांची उपस्थिती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in