बीड : जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री अशा उल्लेखामुळे भाजपनेत्या पंकजा मुंडे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा याच वाक्यामुळे त्यांची राजकीय कोंडी देखील झालेली आहे. मात्र आता शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने पंकजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते म्हणजे स्वागत फलकारील ‘भावी मुख्यमंत्री’ या उल्लेखाने. शनिवारी पंकजा मुंडेंची परिक्रमा जिल्ह्यात दाखल झाली. त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र फलक झळकले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे शनिवारी पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे स्वागत झाले. तेलगाव (ता. धारूर) येथे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकावर पंकजा मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यासोबतच त्यांच्या छायाचित्राच्या पाठीमागे विधिमंडळाची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त राज्य भाजपातील एकाही नेत्याचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही. स्वागतोत्सुक म्हणून परळी भाजप असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. तेलगाव परिसरात काही कमानी देखील लावण्यात आलेल्या असून तिथेही पंकजांचा भावी मुख्यमंत्री म्हणूनच उल्लेख झालेला आहे.

हेही वाचा >>> शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

दरम्यान पंकजा मुंडेंनी यापूर्वी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून झालेल्या उल्लेखावर स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानंतरही याच उल्लेखावरून राजकीय चर्चा देखील रंगली होती. मध्यंतरी दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय पंकजांनी घेतला होता. दोन महिन्यानंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू करून राज्यभरातील अनेक देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेतले. या परिक्रमेस मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत देखील होऊ लागले आहे. शनिवारी ही परिक्रमा जिल्ह्यात दाखल झाली. पाटोदा येथील स्वागत आणि भगवान बाबा जयंती उत्सव सोहळय़ास उपस्थिती दर्शवून पंकजा मुंडेंची परिक्रमा बीड शहरात दाखल झाली होती.

हेही वाचा >>> “राज्याचे ऑनलाईन नेतृत्व करणारे उध्दव ठाकरे आता…”; शंभूराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

१५१ तोफांची सलामी

बीड जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे स्वागत झाले. पाटोदा येथे १५१ तोफांची सलामी देऊन आणि जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. पाटोदाहून बीडकडे येत असतानाही त्यांचे जागोजागी स्वागत झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde is mentioned as the future chief minister on the welcome board of parikrama yatra ysh
Show comments