वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची, तर उपाध्यक्षपदी नामदेव आघाव यांची बिनविरोध निवड झाली. स्थापनेपासून गोपीनाथ मुंडे हेच या कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दमदार विजय मिळवल्यानंतर सोमवारी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
परळी तालुक्यातील पांगरी येथे गोपीनाथ मुंडे यांनी १५ वर्षांपूर्वी या कारखान्याची उभारणी केली. उभारणीपासूनच कारखान्याने सहकार क्षेत्रातील अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळे या कारखान्याची सर्वदूर ओळख निर्माण झाली. गोपीनाथ मुंडे यांचा या कारखान्यावर एकतर्फी अंमल होता. १५ वर्षे मुंडेच या कारखान्याचे अध्यक्ष राहिले. मागील वर्षी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन संचालक मंडळाची निवडणूक झाली. सर्व २० संचालक मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सोमवारी सकाळी कारखाना सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत बठक झाली. अध्यक्षपदासाठी पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदासाठी नामदेव आघाव या दोघांचीच नावे आल्यानंतर सर्वानीच अनुमोदन दिले. परिणामी दोघांचीही बिनविरोध निवड कांबळे यांनी जाहीर केली. कारखान्याचे वैभव टिकवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आíथक प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
गजानन बँकेच्या अध्यक्षपदी
आमदार जयदत्त क्षीरसागर
वार्ताहर, बीड
गजानन नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांची, तर प्रा. जगदीश काळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कर्ज देणे हा उपकार नसून, ग्राहकच बँकेचा कणा असल्याने चांगले ग्राहक जोडून रिझव्र्ह बँकेचे नियम पाळून कर्जवाटप आणि कर्जवसुली केली, तर बँकेला चांगले यश मिळू शकते, असे मत क्षीरसागर यांनी व्यक्त केले. कर्मचाऱ्यांनी अंगी शिस्त बाळगावी. ग्राहकांशी सौजन्याने वागून बँकेचा व्यवहार वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. स्वामी यांच्यासह बँकेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader