महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, अलीकडेच अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सरकार चालवलं जात आहे. पण संबंधित नेत्यांकडून लोकांच्या समस्या सोडवल्या जातायत का? त्यांच्याकडून लोकांना न्याय मिळतोय का? तिघांमधील आश्वासक चेहरा कोण? यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी तुम्हाला कोणता चेहरा जास्त आश्वासक वाटतो? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “त्यांच्याकडे पाहून मला सध्या फार काही वाटत नाही. मला सगळेजण खूप तणावात दिसतात. कारण सत्तेत आल्यापासून त्यांच्यामागे कोणते ना कोणते प्रश्न सुरू आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरी पूर आला होता, आता पाणी नाही. अशा समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवताना मी त्यांना पाहिलं नाही. त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही.”

हेही वाचा- “शिंदेंना बरोबर घेणं भाजपाची गरज होती, पण अजितदादांबद्दल…”, पंकजा मुंडेंचं थेट विधान

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलं आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मी त्यावेळी पाहिला आहे. अजित पवारांबरोबर काम करण्याचा कधी योग आला नाही. पण नोकरशाहीवर त्यांचा बराच प्रभाव आहे, हे मी प्रसारमाध्यमांतून पाहिलं आहे. ते स्पष्ट बोलतात. एकनाथ शिंदेंबाबत बोलायचं झालं, तर त्यांचे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. ते एकदम शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना लळा लावलाय, हे मला ऐकून माहीत आहे.”

हेही वाचा- “जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!

खरं तर, माजी मंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच राजकारणातून ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांची सुट्टी घेतल्यानंतर त्यांनी राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विविध देवस्थानांना भेटी देत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, त्यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत देताना सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde on cm eknath shinde devendra fadnavis and ajit pawar for main trusted face rmm
Show comments