Pankaja Munde on Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली. तसंच, तिच्यावर चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असं आवाहनही केलं. तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेकजण उतरले आहेत. आता, मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.”

Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
Sushma Andhare prajakta Mali
Sushma Andhare : “प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…”, सुषमा अंधारेंचं विधान चर्चेत!
What Suresh Dhas Said About Prajakta Mali?
Suresh Dhas : प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच सुरेश धस म्हणाले, “जे काही…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का?
Deepali Sayed and prajakta mali
Deepali Sayed : “करुणा मुंडेंने नाव घेतलं तेव्हाच…”, प्राजक्ता माळीप्रकरणावर दीपाली सय्यद यांनी मांडली भूमिका!

त्या पुढे म्हणाल्या, “भावना कुठे आहेत? चिमुकल्यांवर बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना. पण कायद्याने, नियमाने! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने स्त्री आणि तिचं सत्व सॉफ्ट टार्गेट आहे. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all.”

हेही वाचा >> Sushma Andhare : “प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…”, सुषमा अंधारेंचं विधान चर्चेत!

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच, धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसह माळीचेही नाव घेत टिप्पणी केली होती.

Story img Loader