केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “एकनाथ शिंदे आता शिवसेनाप्रमुख”; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य; म्हणाले, “घराणेशाही…”

Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त बीडमध्ये वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ”आज महाशिवरात्री आहे. त्यामुळे मी राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, ज्यांना चिन्ह मिळालं आणि ज्यांना नाही मिळालं, अशा दोघांनाही या निर्णयाला पुढे नेण्यासाठी ईश्वर शक्ती देवो”, असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून मी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आज कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्याच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर; आज पंतप्रधान मोदींवरच्या मराठी पुस्तकाचं करणार प्रकाशन

शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

दरम्यान, शुक्रवारी राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे.

Story img Loader