धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर ही काठी उगारायला मागे- पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नांदेडमधील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेत धनगर आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पंकजा मुंडे, रासपचे प्रमुख महादेव जानकर आदी मंडळी उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला जाहीर वचन देते की धनगर समाजाला आरक्षण मिळणारच. धनगर समाजाने पुन्हा एकदा भाजपाला साथ दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीबाहेरही जाण्याची तयारी आहे. तुमच्यासोबत मेंढरांमागे येण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

धनगर समाजामुळे आज सत्तेत आहोत हे आम्ही विसरणार नाहीत. आरक्षण तर देणारच पण ते मिळेपर्यंत समाजासाठी विकास योजना राबवू. आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्यास मी सर्वाच्या पुढे राहील, त्यात राजकारण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.  मला सत्तेची लालसा नाही. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत मंत्रालयातील दालनातही प्रवेश करु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. मी माझ्या वडिलांचे नाव लावत असल्याने अनेकांना त्रास होतो. एकीकडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांचा अवमान कराण्याचा काहींचा उद्योग बनला असून प्रत्येक वीस किलोमीटरला वारसा बदलणारे, तोडपाणी करून राजकारण करणाऱ्यांनी अगोदर आपला वारसा नेमका कोणाचा? हे ठरवावे असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला होता.