भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दोन महिने राजकीय ब्रेकवर गेल्या होत्या. यानंतर ‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. राज्यातील विविध भागांचा दौरा पंकजा मुंडे करत आहेत. शनिवारी ( ९ सप्टेंबर ) पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती’ यात्रा बीडमधील पाटोदा येथे पोहोचली. तेव्हा पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी घरी बसले नव्हते. तर, गढूळ परिस्थितीला वैतागले होते,” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती उत्सव सोहळ्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या.

हेही वाचा : “राज्याचे ऑनलाईन नेतृत्व करणारे उध्दव ठाकरे आता…”; शंभूराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी घरी बसले नव्हते. गढूळ परिस्थितीला वैतागले होते. काही बोलायलं गेलं, तर दुसरंच चालवलं जायचं. माझ्या मागे बरेच प्रश्न होते. ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अडचणी आणि बरेच प्रश्न आहेत. जमेल तसे तेही प्रश्न सोडवू.”

हेही वाचा : परिक्रमा यात्रेच्या स्वागत फलकावर पंकजा मुंडेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!

“पंकजा मुंडे राजकारणात काय करेन, काय नाही करेन. पण, कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही. मी रणांगणात उतरले आहे. हे रन रखरखतं आहे. काहीजण मला ‘अहंकारी’ म्हणतात. मात्र, माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. मला तुमचा ( जनतेचा ) गर्व आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde said why go two months breaks in beed shivshakti yatra ssa
Show comments