भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त आज (३० ऑक्टोबर) भाजपच्या अनेक नेत्यांनी अभिवादन करत ट्वीट केलेत. यात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंचाही समावेश आहे. पंकजा मुंडेंनी प्रमोद महाजन यांच्यासोबतचा आपला अगदी जुना फोटो ट्वीट करत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या तेव्हाची आठवण सांगितलीय. यावर मुंडे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रमोद महाजन यांची मुलगी खासदार पुनम महाजन यांनीही एक व्हिडीओ ट्वीट केलाय.
पंकजा मुंडे फोटो ट्वीट करत म्हणाल्या, “मी पहिल्यांदा आमदार झाले. भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार होता. तो दिवस प्रमोद महाजनांच्या जयंतीचा होता. त्यांचे अमोघ वक्तृत्व आणि स्वतःच्या बुद्धीच्या बळावर मिळवलेले कर्तृत्व हे उदाहरण माझा आदर्श आहे.”
“क्या हार में, क्या जीत में, किंचित…”
दरम्यान, पूनम महाजन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रमोद महाजन एक कविता ऐकवत असून त्यातून त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी स्पष्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे.
पूनम महाजन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयींच्या एका कवितेतल्या काही ओळी ऐकवत आहेत. “क्या हार में, क्या जीत में…किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथपर जो भी मिला, ये भी सही, वो भी सही”, अशी वाक्य प्रमोद महाजन या व्हिडीओमध्ये बोलून दाखवत आहेत.
हेही वाचा : “क्या हार में, क्या जीत में, किंचित…”; पूनम महाजन यांनी शेअर केला प्रमोद महाजन यांचा जुना व्हिडीओ!
पुढे व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “मला वाटतं की या कवितेचा जो भावार्थ आहे त्याच्यासोबत मी चालत राहातो. हार-जीतच्या दृष्टीकोनातून मी स्वत: माझ्या आयुष्याकडे बघत नाही. समोरचा तसं बघत असेल, तर तो त्याचा दृष्टीकोन आहे, मी त्याला थांबवू शकत नाही”.