विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या सार्वजानिक बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्य़ातील पनवेल भागात राहणारा महादेव कोळी (५०) असे मृतकाचे नाव असून शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव रवाना करण्यात आले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आठ दिवसांपासून महादेव कोळी नागपुरात आले होते. रायगडमध्ये सार्वजानिक बांधकाम विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत होते. नागपूर अमरावती मार्गावरील रविनगरजवळी शासकीय कॉलनी परिसरात त्याची डय़ुटी लावण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी दिवसभरचे कामकाज आटोपून रात्री जेवण करून बाहेर निघाले. आज सकाळी त्या भागात काही शासकीय कर्मचारी फिरत असताना शासकीय निवास कॉलनी परिसरात एक कर्मचारी बेवारस स्थितीत झोपलेला दिसला. त्याला काहींनी उठविण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळला नाही. ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्याने लागलीच अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी महादेवला मेडिकलमध्ये हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. महादेव कोळी गेल्यावर्षीही नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी कॉटेजवर ते कामाला असल्याची माहिती मिळाली. महादेव कोळी यांचे शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव रायगडला पाठविण्यात आले. महादेवच्या कुटुंबीयांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास अंबाझरी पोलिस करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा