अकोला शहरातील गोरक्षण मार्ग भागात राहणाऱ्या आणि स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगणाऱ्या ‘नटवरलाल’ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने शेती खरेदीच्या बदल्यात पैशांऐवजी कागदाने भरलेली बॅग देऊन पुण्यात राहणाऱ्या महिलेची १२.२० लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सचिन शेटे असे या आरोपीचे नाव. त्याने पुणे येथे मुलीसोबत राहणाऱ्या भारती पाटील यांच्या मालकीचे बाळापूर तालुक्यातील लोणाग्रा येथील शेत खरेदी करण्यासाठी इसार केला. शेतखरेदीच्या दिवशी स्वत:च्या घरी नेऊन पैसे मोजण्यास दिले आणि ‘ती’ बॅग महिलेला सोपविली. यानंतर महिलेने बॅग उघडून बघितली असता तिला धक्काच बसला. त्या बॅगेत पैशांऐवजी कागद भरलेले होते.
युवतीचे धाडस अन् शिकारी अडकला; पाणकोंबडीची शिकार करणाऱ्यास शिताफीने पकडले
पैसे ठेवलेल्या बॅगसारखीच दुसरी बॅग देऊन सचिन शेटेने आपली १२ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिन शेटेला बेड्या ठोकल्या. आरोपी शेटेने यापूर्वीही अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे.