महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा सध्या सुरू आहे. या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेत पाचगणीमध्ये काल भूगोलाच्या इंग्रजी माध्यमाच्या २२१ प्रश्नपत्रिका कमी आल्याने परीक्षा केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.    
     काल भूगोलाचा पेपर होता. पाचगणीत इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. सकाळी अकरा वाजता प्रश्नपत्रिका परीक्षा वर्गात पोहोचविण्यापूर्वी इंगजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका कमी असल्याचे केंद्रप्रमुखांच्या लक्षात आले. इंग्रजी माध्यमाऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका जास्त आल्या होत्या. ताबडतोबीने ही बाब परीक्षा मंडळाला कळविण्यात आली. परीक्षा मंडळाचे सचिव शरद गोसावी व साताऱ्याचे शिक्षणाधिकारी मकरंद गोंधळी ताबडतोब पाचगणीत दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढण्यात आल्या व एक तास उशिराने बारा वाजता भूगोल विषयाची परीक्षा सुरू झाली. तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला.

Story img Loader