महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक निकालांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना सत्ताधारी पक्षांच्या बऱ्याच विजयी आमदारांना एकसारखी मतं कशी पडली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी थेट आकडेवारी मांडत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा केला आहे. द वायरसाठी सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये परकला प्रभाकर यांनी आकडेवारीनिशी दावे केले आहेत.

५० तासांत ७६ लाख मतं वाढली!

मतमोजणीच्या दिवशी २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत मतांच्या एकूण आकड्यात व पर्यायाने टक्केवारीतही अविश्वसनीय वाढ झाल्याचा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे. “मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती. ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात. त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवाऱी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली. हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली. एवढंच नाही, तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची भर पडल्याचं सांगण्यात आलं”, असं ते म्हणाले.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
cm Eknath shinde loksatta interview
खोटे कथानक निवडणुकीत चालणार नाही!
Narendra Modi and Rahul Gandhi Chimur, Chimur,
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा
Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप!
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मतं वाढण्यासाठी कोणता युक्तिवाद?

दरम्यान, मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात वाढलेल्या मतांसाठी सत्ताधारी वर्गाकडून रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांचं कारण दिलं जात आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (मतदानाची मुदत) रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांनी नंतर मतदान केल्यामुळे ही वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच दाव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी चर्चा करण थापर व परकला प्रभाकर यांच्यात या मुलाखतीदरम्यान झाली.

१ हजार मतं साडेसहा तासांत शक्य आहेत का?

मुलाखतीमध्ये करण थापर यांनी मतांचा आकडा आणि लागणारा वेळ यांचं गणित मांडलं. “आपण असं मानुयात की संध्याकाळी ६ पर्यंत मतदान केंद्राबाहेरच्या रांगेत १००० मतदार उभे होते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी किमान १ मिनीट लागतो असं गृहीत धरलं तर १ हजार मतदारांना मतदान करण्यासाठी १ हजार मिनीटं लागतील. याचा अर्थ मतदान केंद्राबाहेरच्या सर्व १ हजार मतदारांना मतदान करण्यासाठी १६.५ तास मतदानासाठी लागतील. पण प्रत्यक्षात ५ नंतर पुढच्या साडेसहा तासांत म्हणजेच ११.३० वाजता मतदान प्रक्रिया संपल्याचं आयोगानं जाहीर केलं. त्यामुळे या काळात सर्व १ हजार मतदारांनी मतदान करणं शक्यच नाही. मग हा ७६ लाखांचा आकडा कसा वाढला?” असा प्रश्न करण थापर यांनी केल्यानंतर त्यावर परकला प्रभाकर यांनी आणखी दोन मुद्दे मांडले.

“मग दिवसभर मतदानच झालं नाही का?”

“आणखी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. भारतात प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १००० ते १२०० मतदार असतात. जर मतदान संपल्यानंतर १००० मतदारांनी मतदान केलं असेल, तर मग दिवसभर त्या मतदान केंद्रांवर काहीच मतदान झालं नाही का? पण निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झालं होतं”, असा मुद्दा परकला प्रभाकर यांनी मांडला.

Parakala Prabhakar on Maharahshtra Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात घोटाळा? केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मांडलं गणित!

“त्याशिवाय दुसरी बाब म्हणजे निवडणूक आयोगाची नियमावली. त्यात म्हटलंय की जर मुदत संपेपर्यंत काही मतदारांना मतदान करता आलं नाही, तर मुदत संपताक्षणी मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात यावेत. रांगेत उभ्या असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीला १ क्रमांक देऊन सगळ्यात पहिल्या जागी उभ्या व्यक्तीला शेवटचा क्रमांक दिला जावा. जेणेकरून त्यात नव्याने कुठली भर पडणार नाही. या सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण केलं जावं. पण आपण आयोगाकडे चित्रीकरणाची मागणी केली तर आयोग त्यावर काहीच बोलत नाही”, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला आहे.