परभणी : सलग दोन दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आज शहरातले वातावरण निवळले असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसातील घटनांमध्ये शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्ह्यांची नोंद झाली. एकूण ५० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माध्यमांना दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही परभणी येथे जाऊन जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात तात्काळ संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी उशिरा मोठा जमाव पुतळा परिसरात दाखल झाला. काही दगडफेकीच्याही घटना घडल्या.घटनेच्या दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या जमावाने शहरातल्या बाजारपेठेत घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा
Walmik Karad Arrest
Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी
youth abused minor pune, gymnasium, Pune,
पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी
Chinmoy Das bail rejected
हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय

हेही वाचा >>> Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”

ज्या इसमाने संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासह आता एकूण आठ गुन्हे या प्रकरणात दाखल झाले आहेत. बंद दरम्यान तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या घटनांमध्येही गुन्ह्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यात ४१ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. शहरातील दुकानांचे फलक नासधूस करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमाखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांकडे जसजसे या घटनांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध होत आहे त्यानुसार संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस संबंधित व्यक्तींना हस्तगत करत असून जे दोषी निष्पन्न होतील त्या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाईल असेही उमप यांनी स्पष्ट केले. पोलीस हे वस्त्यांमध्ये घुसून आंदोलकांना लक्ष्य आहेत.

हेही वाचा >>> Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला

‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरू आहे या काही नेत्यांनी केलेल्या आरोपांचा उमाप यांनी इन्कार केला. परिस्थिती नियंत्रणात आणताना काही लोकांची धरपकड करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून कोणतेही ‘कोंबिंग ऑपरेशन’ करण्यात आले नाही, असे ते म्हणाले. सुरुवातीला परिस्थिती हाताळण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले का या प्रश्नावर उमाप यांनी घटनेची व्याप्ती वाढल्यानंतर पोलिसांना अनेक ठिकाणी जावे लागले त्यामुळे काही अवधी लागला असला तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. एका पोलीस उपअधीक्षकासह नऊ पोलीस अंमलदार या प्रकरणात किरकोळ जखमी झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपीला अटक झाल्यानंतर यामागे सूत्रधार कोण आहे किंवा यात काही कट आहे का या बाबी तपासानंतरच स्पष्ट होतील असेही ते म्हणाले.

Story img Loader