सोलापूर : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना, नंतर त्याचे पडसाद उमटून झालेल्या आंदोलनातील प्रमोद सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एसटी बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. सोलापूर मध्यवर्ती एसटी आगारात थांबलेली शिवशाही बस जाळण्याचाही प्रकार घडला.

दरम्यान, शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती एसटी आगारात थांबलेल्या एका शिवशाही बसला (एमएच ०६ बीडब्ल्यू ०५८९) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावली. यात संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

In wake of changes in laws it will be mandatory for police need to adopt new technologies
नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे मत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
youth from Buldana district disqualified from job of Central Reserve Police Force due to blemishes on his skin
त्वचेवरील डागामुळे पोलीस नोकरीत अपात्र ठरविले, उच्च न्यायालयात प्रकरण…
pune crime news
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे

हेही वाचा : “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

सोलापूरहून साता-याकडे निघालेल्या एसटी बसवर (एमएच १४ बीटी ४९५२) सम्राट चौकाजवळ अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. बसच्या अग्रभागी असलेली मोठी काच दगडफेकीमुळे फुटली. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. तर तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या एका एसटी बसवर (एमएच ११ बीएल ९३६१) कारंबा नाक्याजवळ अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. बसच्या डाव्या बाजूला प्रवासी दरवाजावरील काचेवर मोठा दगड मारल्याने काच फुटली आणि त्यात दोन प्रवासी जखमी झाले. याशिवाय अन्य एका एसटी बसवरही (एमएच ०५ ईएम १३८२) दगडफेक झाली.

Story img Loader