ज्या तडजोडी निकालानंतर अपेक्षित आहेत त्यांची चर्चा आधीच सुरू झाल्याने परभणी जिल्ह्य़ात ‘काँग्रेस-शिवसेना’ हे मत्रिपर्व सध्या गावपातळीपर्यंत चच्रेत आले आहे. परस्परांच्या सोयीचे उमेदवार उभे करण्यापासूनच या चच्रेला प्रारंभ झाल्याने परीक्षेआधीच पेपर फुटला अशी गत या ‘फिक्सिंग’बाबत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्य़ात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आखाडय़ात आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ गटांपकी सर्वाधिक ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले असून ही संख्या ५२ आहे, तर अन्य राजकीय पक्षांना सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत. शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने ‘आयात’ उमेदवारांनाच उमेदवारीचा टिळा लावून वेळ मारून नेली आहे. प्रचाराचा धुराळा खाली बसल्यानंतर आता बहुतांश गटांमध्ये थेट ‘वाटपा’ला प्रारंभ झाला असून काही गटांमध्ये पाचशे, तर काही गटांमध्ये चक्क एक हजार रुपये मताप्रमाणे हे वाटप सुरू असल्याची चर्चा आहे.

निकालानंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला येईल अशी स्थिती नसल्याने संभाव्य तडजोडीची चर्चा आतापासूनच रंगात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी निकालानंतर होणारच नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने सत्ता हस्तगत करायची असा डाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी आखला आहे. जिल्ह्य़ात ‘काँग्रेस-शिवसेना’ असे फिक्सिंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून अनेकदा झाला; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभेत हा आरोप केल्याने या फिक्सिंगची चर्चा ‘सर्वतोमुखी’ झाली.

दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि शिवसेना अशी सत्तेची वाटणी झाली. अठरापकी दहा जागा जिंकूनही उपसभापतिपद शिवसेनेला आणि सभापतिपद काँग्रेसला असा हा अजब करार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरपुडकर आणि खा. संजय जाधव यांच्यातील राजकीय हितसंबंधातून विकसित झालेल्या या कराराचा पुढचा अध्याय म्हणून आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. विजय भांबळे (जिंतूर), डॉ. मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी या सर्वच नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात नेटाने झुंज द्यावी लागत आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिगत संबंधाचे करार आणि त्यानुसार होणारे मत्री अथवा वैर याच बाबी प्रकर्षांने दिसून येत आहेत.

वारसदारांच्या भवितव्यासाठी पुढाऱ्यांचा जीव टांगणीला

वारस आणि आप्तांच्या भवितव्यासाठी जिल्ह्य़ातले दिग्गज जंग जंग पछाडत असून कोणत्याही परिस्थितीत पराभव परवडणारा नाही म्हणून जिल्ह्य़ातल्या नेते मंडळींची आपल्या वारसाच्या राजकीय भवितव्यासाठी शर्थीची झुंज चाललेली आहे.

जिल्ह्य़ात सध्या अनेक पुढाऱ्यांचे वारस निवडणुकीच्या िरगणात आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर हे पोखर्णी गटातून निवडणूक लढवत आहेत, तर माजी खासदार तुकाराम रेंगे यांचे चिरंजीव बाळासाहेब हे जांब या गटातून निवडणूक लढवत आहेत. सुरेश वरपुडकर यांच्या वहिनी दीपाताई वरपुडकर याही ताडकळसमधून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. बाळासाहेब जामकर यांनी आपले चिरंजीव संग्राम यांना निवडणुकीच्या मदानात उतरविले आहे. उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांचे जावई राम फड हे कोद्रीतून उभे आहेत. एके काळचे बोर्डीकर समर्थक प्रभाकर वाघीकर यांनी शिवबंधन बांधल्यानंतर आता त्यांच्या स्नुषा स्नेहा रोहिनकर या रामपुरी गटातून, तर पत्नी बेबीनंदा वाघीकर या कौसडी गटातून निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या स्नुषा अमृता सुरेश नागरे याही आडगाव बाजार येथून निवडणुकीच्या मदानात आहेत. एकूणच जिल्ह्य़ातील अनेक नेत्यांनी नेतृत्वाच्या नव्या फळीत आपल्या वारसदारांना पुढे केले असले तरीही यातील कोणाच्या वारसदारांना मतदार स्वीकारणार आणि कोणाच्या वारसदारांना मतदार नाकारणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनाकाँग्रेसच्या तडजोडीची चर्चा सर्वतोमुखी

जिल्ह्य़ातील अनेक नेत्यांनी नेतृत्वाच्या नव्या फळीत आपल्या वारसदारांना पुढे केले असले तरीही यातील कोणाच्या वारसदारांना मतदार स्वीकारणार आणि कोणाच्या वारसदारांना मतदार नाकारणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. मात्र आपल्या वारसांच्या भवितव्याने या सर्वच पुढाऱ्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.

जिल्ह्य़ात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आखाडय़ात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani zp election