Parli Election Result:Dhananjay Munde vs Rajesaheb Deshmukh : परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परळीसह बीडमधील जनतेने अनपेक्षित निकाल दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. २००९ साली गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची मुलगी पकंजा मुंडे यांनी परळीचं नेतृत्व केलं. सलग दोन वेळा आमदार राहिल्यानंतर २०१९ साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवताना पंकजा मुंडेंविरोधात विजय मिळवला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर (राष्ट्रवादी) आहेत. ते या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत पकंजा मुंडे आता विधान परिषदेवर गेल्यामुळे या मतदारसंघात संपूर्ण मुंडे कुटुंबाने धनंजय मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. मात्र, यावेळी धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या राजकीय डावपेचांचा सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेले बजरंग सोनवणे यांना उभं करून जिंकवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली गेली आहे. परळीत यंदा राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे.
परळी मतदारसंघातील प्रत्येक घडामोडीचे व मतमोजणीचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
Parli Assembly Election Result 2024 Live Updates : परळीत धनंजय मुंडे विजयी, राजेसाहेब देशमुखांचा पराभव
परळीत धनंजय मुंडे विजयी, सहा फेऱ्यांनंतर ४२ हजार मतं, राजेसाहेब देशमुखांना अवघी १२ हजार मतं.
धनंजय मुंडेंना २२ हजार मतांची आघाडी
धनंजय मुंडे यांना पाचव्या फेरीअखेर ३४,१२६ मतं मिळाली आहेत. त्यांना तब्बल २२ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
तिसऱ्या फेरीनंतरही धनंजय मुंडे यांची आघाडी कायम आहे. मुंडेंना ११ हजार मतांनी आघाडी मिळाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. महाराष्ट्रात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसत्ता.कॉमवर तुम्ही सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स पाहू शकणार आहेत. निकालांकडे ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Dhananjay Munde : धनंजय मुंडे आघाडीवर
धनंजय मुंडे दोन हजार मतांनी आघाडीवर
Parli Vidhan Sabha Result Live : परळीत धनंजय मुंडे आघाडीवर
परळीत राष्ट्रवादीचे (धनंजय) धनंजय मुंडे आघाडीवर आहेत.
Parli Vidhan Sabha Result Live : मागील निवडणुकीत धनंजय मुंडेंनी ३० हजार मतांनी विजय मिळवला होता.
परळी मतदारसंघात विजय-पराजयाचे अंतर ३०७०१ इतके होते. म्हणजेच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर ३० हजार मतांनी मात केली होती.
२०१९ ची परिस्थिती काय होती?
परळी विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी १,२१,११४ मते (५४.४) मिळवून आघाडी घेतली, तर भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना ९१,४१३ मतं (४०.८) मिळाली होती.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडलं, हे आज समजेल. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत झाली आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यात महायुतीची सत्ता येील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही एक्झिट पोल्समधून मविआच्या बाजूने कल दर्शवला आहे. त्रिशंकू स्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
EditDelete
आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
दिड तासांनी मतमोजणीला सुरुवात होईल, दुपारपर्यंत परळीच्या जनतेचा कल लक्षात येईल.
परळी विधानसभेत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे तसेच ईव्हीएम फोडण्याचे प्रकार समोर आले.
Parli Vidhan Sabha Result Live : मतदानाच्या दिवशी काय झाले?
परळी विधानसभेत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे तसेच ईव्हीएम फोडण्याचे प्रकार समोर आले.
Parli Vidhan Sabha Election Result Pankaja Munde: पंकडा मुंडे म्हणाल्या, घड्याळ चिन्ह लक्षात असू द्या
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या आपल्या सर्वांच्या मनात कमळ असलं तरी या निवडणुकीत धनंजयसाठी सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून त्याला विजयी करा.
Parli Vidhan Sabha Result Dhananjay Munde : पंकजा मुंडेंकडून भावासाठी प्रचार
धनंजय मुंडे यांच्या प्रचारादरम्यान, पंकज मुंडे यांनी म्हणाल्या होत्या की “मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रांवर तुम्ही कमळाचे बटनच शोधणार आहात. कारण तुमच्या डोक्यात कमळच बसले आहे. पण असू द्या, त्यादिवशी जा आणि घड्याळाचेच बटन दाबा. मला वाटते हे सगळे करण्यापेक्षा धनंजयने कमळच हातात घेतले असते तर बरे झाले असते.”
Parli Vidhan Sabha Result Live Updates: शरद पवारांची धनंजय मुंडेवर टीका
शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारकाळात परळीमध्ये राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडेंवर कडाडून टीका केली होती. “काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटकाळात मदतीची आवश्यकता होती. त्या त्या वेळी त्यांना माझ्याकडून मदत केली गेली. त्यांना पराभवानंतरही आमदारकी व नंतर मंत्रिपद दिलं. मात्र सत्ता आल्यावर सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. यामुळे जनतेचं मोठे नुकसान झालं”, असं शरद पवार म्हणाले.
Parli Vidhan Sabha Result Live Updates: वंजारा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी सुटकेचा निःश्वास सोडला
परळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात दंड थोपटण्याची तयारी केलेल्या दोन संभाव्य उमेदवारांनी घेतलेली माघार मुंडेंच्या पथ्यावर पडली. वंजारा समाजाच्या मतपेढीत विभाजन होण्याचा धोका टळल्याचे चित्र मानले जात आहे.
Parli Vidhan Sabha Result : परळी विधानसभेतील २०२४ चे उमेदवार कोण?
Parli Vidhan Sabha Result Live : परळी विधानसभेत एकूण ७२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली गेली आहे. करुणा मुंडे यांनीही परळीतून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज बाद झाला.