Parli Election Result:Dhananjay Munde vs Rajesaheb Deshmukh : परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परळीसह बीडमधील जनतेने अनपेक्षित निकाल दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. २००९ साली गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची मुलगी पकंजा मुंडे यांनी परळीचं नेतृत्व केलं. सलग दोन वेळा आमदार राहिल्यानंतर २०१९ साली धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवताना पंकजा मुंडेंविरोधात विजय मिळवला. आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर (राष्ट्रवादी) आहेत. ते या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत पकंजा मुंडे आता विधान परिषदेवर गेल्यामुळे या मतदारसंघात संपूर्ण मुंडे कुटुंबाने धनंजय मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. मात्र, यावेळी धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या राजकीय डावपेचांचा सामना करावा लागणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेले बजरंग सोनवणे यांना उभं करून जिंकवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली गेली आहे. परळीत यंदा राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा