Lok Sabha Session 2024 : देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. आज (२५ जून) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाचं कामकाज पुढील १० दिवस चालणार आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे कालपासून नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ देत आहेत. देशभरातील खासदार हिंदीसह त्यांच्या-त्यांच्या मातृभाषेत अथवा इतर भाषांमध्ये शपथ घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा शपथविधी पूर्ण झाला असून राज्यातल्या बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली. परंतु, राज्यातील नऊ खासदारांनी हिंदीत तर तीन खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार (अहमदनगर) निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतलेली ही शपथ मतदारसंघातील विरोधक सुजय विखे पाटील यांच्या प्रचारादरम्यानच्या टीकेला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सोमवारी पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मराठीतून शपथ घेतली होती. त्यांच्यापाठोपाठ आज ३६ खासदारांनी मराठीतून शपथ घेतली.

धैर्यशील माने, छत्रपती शाहू महाराज (दुसरे), उदयनराजे भोसले, धैर्यशील मोहिते पाटील, शिवाजी काळगे, ओम राजेनिंबाळकर, बजरंग सोनावणे, भाऊसाहेब वाकचौरे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, स्मिता वाघ, सुनील तटकरे, अरविंद सांवत, अनिल देसाई, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, संजय दिना पाटील, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, सुरेश (बाळ्यमामा) म्हात्रे, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, संदिपान भुमरे, कल्याण काळे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, अमर काळे, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव, रक्षा खडसे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांनी मराठीतून शपथ घेतली.

नारायण राणे, विशाल पाटील, प्रणिती शिंदे, प्रशांत पाडोळे, श्यामकुमार बर्वे, पीयुष गोयल, गोवाल पडवी, अनुप धोत्रे आणि नितीन गडकरी यांनी हिंदीतून शपथ घेतली. तर, निलेश लंके, हेमंत सावरा आणि नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

हे ही वाचा >> भारतात ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणार अध्यक्षपदासाठी निवडणूक!

लोकसभा अध्यक्षांनी नागेश पाटील आष्टीकरांना शपथ घेताना थांबवलं

हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारकीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी यावर आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवलं. त्यानंतर आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यावी लागली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament session 2024 7 maharashtra mp took oath in hindi 3 prefer english asc
Show comments