Lok Sabha Session 2024 : देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापनेनंतर १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू झालं आहे. आज (२५ जून) अधिवेशनचा दुसरा दिवस असून सभागृहात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी चालू आहे. सोमवारी केंद्रीय मंत्री आणि एनडीएतील खासदारांचा शपथविधी पार पडला. आज महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी चालू आहेत. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार (अहमदनगर) निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. तसेच निलेश लंके यांची ही शपथ त्यांचे मतदारसंघातील विरोधक सुजय विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला. ही निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर शिक्षणावरून टीका केली होती. “निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन”, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारकाळात निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच काही प्रचारफेऱ्यांमध्ये आणि सभांमध्ये इंग्रजी वाक्ये बोलून दाखवली होती. दरम्यान, खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेत लंके यांनी पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केली आहे.

nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

निलेश लंकेंची खासदारकीची शपथ

I, Nilesh Dnyandev Lanke, having been elected a member of the House of People do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी

हे ही वाचा >> ‘या’ भाजपा खासदाराने ईश्वराच्या नावाने शपथ घेतली नाही, सभागृहात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा वर्धापनदिन (१० जून) साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करताना निलेश लंके यांनी दमदार भाषण केलं होतं. त्या भाषणावेळी देखील लंके यांनी इंग्रजीतून भाषणाची सुरुवात करत लंकेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. निलेश लंके त्यांच्या भाषणात म्हणाले होते “सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची… Pawar is the Power… सगळ्यांचा नाद करायचा, पण पावारांचा नाद केला तर ते भल्याभल्याना घरी बसवतात. शरद पवार हे आम्हा सर्वांचं दैवत आहे.”