गुंडगिरीतून राजकारणात आलेला अरुण गवळी याच्या पॅरोलला पुढल्या सुनावणीपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
अवकाशकालीन न्या. एम.एल. तहलियानी यांच्या खंडपीठासमोर गवळीच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. आईची प्रकृती अस्वस्थ असल्याने पॅरोलची मुदत वाढण्याची विनंती गवळीने केली होती. न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी २६ मे रोजी निश्चित केली. तोपर्यंत पॅरोलला मुदतवाढ देण्याचा आदेश न्यालयाने दिला.
गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारगृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचा मुलगा महेशचा ९ मे रोजी मुंबईत विवाह होता. न्यायालयाने त्यांच्या या विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. पॅरोलवर कारागृहातून ५ मे रोजी तो बाहेर आला. पॅरोलची मुदत २१ मे रोजी संपली, परंतु गवळीने मुदतवाढ मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने गवळी आणि इतर ११ जणांना ३ ऑगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा