तर शनिवारी संमेलनाच्या प्रवेशद्वारावर परशुरामांचा पूर्णाकृती कटआऊट लावण्यात आला. आधी निमंत्रणपत्रिकेतून चित्र काढायचे आणि नंतर ते व्यासपीठावर विराजमान करायचे, या संमेलन संयोजकांच्या भूमिकेमुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामांच्या चित्राने संमेलनापूर्वीच गदारोळ झाला होता. त्यानंतर निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामांचे चित्र काढण्यात आले. मात्र, शुक्रवारी अचानक संमेलनाच्या व्यासपीठावर परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी, शुक्रवारी व्यासपीठावरील सरस्वतीदेवीच्या छायाचित्राशेजारी खुर्चीवर ही प्रतिमा ठेवण्यात आली. उद्घाटन सोहळ्याच्या धांदलीमध्ये ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नसावी, असा अंदाज आहे.
याशिवाय संमेलननगरीतल्या अतिमहत्त्वाच्या दरवाजाबाहेरही परशुरामांचा पूर्णाकृती कटआऊट लावल्यात आला. या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी लोकसत्ताला सांगितले की, लोटे परशुराम येथील ग्रामस्थ, चिपळूणमधील नागरिक, अशोक तांबे, हभप सहस्रबुद्धे आणि अन्य संघटनांनी ही प्रतिमा व्यासपीठावर लावण्याची मागणी संयोजकांकडे केली. संयोजकांच्या परवानगीनंतर या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन सोहळ्यापूर्वी व्यासपीठावर तिची प्रतिष्ठापना केली.
संमेलनात परशुराम प्रकटला
८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वाद उद्घाटनानंतर थंडावल्याचे चित्र असताना शनिवारी जुन्याच वादाने पुन्हा उचल खाल्ली. संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवरून गायब झालेले परशुरामांचे चित्र शुक्रवारी गुपचूप व्यासपीठावर अवतीर्ण झाले,
First published on: 13-01-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parshuram appeared in gadring