संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामांच्या चित्राने संमेलनापूर्वीच गदारोळ झाला होता. त्यानंतर निमंत्रणपत्रिकेवरील परशुरामांचे चित्र काढण्यात आले. मात्र, शुक्रवारी अचानक संमेलनाच्या व्यासपीठावर परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी, शुक्रवारी व्यासपीठावरील सरस्वतीदेवीच्या छायाचित्राशेजारी खुर्चीवर ही प्रतिमा ठेवण्यात आली. उद्घाटन सोहळ्याच्या धांदलीमध्ये ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नसावी, असा अंदाज आहे.
याशिवाय संमेलननगरीतल्या अतिमहत्त्वाच्या दरवाजाबाहेरही परशुरामांचा पूर्णाकृती कटआऊट लावल्यात आला. या संदर्भात सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी लोकसत्ताला सांगितले की, लोटे परशुराम येथील ग्रामस्थ, चिपळूणमधील नागरिक, अशोक तांबे, हभप सहस्रबुद्धे आणि अन्य संघटनांनी ही प्रतिमा व्यासपीठावर लावण्याची मागणी संयोजकांकडे केली. संयोजकांच्या परवानगीनंतर या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन सोहळ्यापूर्वी व्यासपीठावर तिची प्रतिष्ठापना केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा