कराड : सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील पाथरपुंज (ता. पाटण) येथे यंदाच्या हंगामात तब्बल ७,३१० मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस झाला आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रात आजवर पाथरपुंजबरोबरच वाळवण, नवजा, दाजीपूर व निवळे अशा पाच ठिकाणी सहा हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरलाही यंदा ५९६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास राज्यातील पावसामध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे.

मागील वर्षी पावसाने आखडता हात घेतल्याने राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर यंदा झालेला हा जोरदार पाऊस लक्षणीय ठरला आहे. पाटण तालुक्यातील पाथरपुंजने यंदा सर्वाधिक पावसाचा विक्रम साधला आहे. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यापासून आजवर पाथरपुंजला ७,३१० मिलीमीटर (२८७.७९ इंच) पावसाची नोंद झाली. आजही तिथे जोरदार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे २०१९ साली पाथरपुंजने केलेला ९,९५६ मिलीमीटर (३९२ इंच) पावासाला आपला उच्चांक मागे टाकतो का? हे पहाणे यंदा कुतुहलाचे ठरणार आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Weather forecast for North Maharashtra Marathwada Vidarbha
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार

हेही वाचा – सांगलीत विसर्जनासाठी गेलेली दोन मुले बेपत्ता

सह्याद्रीच्या डोंगररांगांसह पश्चिम महाराष्ट्रात आजवर मान्सूनच्या पावसाचे सरासरीच्या एकतृतीयांशहून अधिकचे प्रमाण राहिले आहे. त्यात विशेषतः पश्चिम घाटमाथ्यावर सतत जोरदार पाऊस झाला आहे. अलीकडे याच प्रदेशातील पाथरपुंज हे ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हणून लौकिकास आले आहे. पाथरपुंज परिसरातील पावसाचे पाणी हे सांगली जिल्ह्यातील वारणा- चांदोली धरणाला मिळते. गेल्या चार- पाच वर्षात गतवर्षीचा अपवाद वगळता पाथरपुंज परिसरातच सर्वाधिक पाऊस होत आहे. सन २०१९ च्या पावसाळ्यात पाथरपुंजने देशात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या मेघालय राज्यातील चेरापुंजीला मागे टाकले. त्यावेळी पाथरपुंजला एकूण ९,९५६ मिलीमीटर (३९२ इंच) पावसाची नोंद झाल्याने स्वाभाविकपणे पाथरपुंज हे चेरापुंजीची बरोबर करणारे ठिकाण म्हणून चर्चेत राहिले.

विशेष म्हणजे यानंतर सलग चारही वर्षे पाथरपुंजला जवळपास सहा ते सात हजार मिलीमीटर पावसाची नोंद राहिली. केवळ गेल्या वर्षी मान्सूनच्या निराशाजनक कामगिरीमुळे त पाथरपुंजचे पाऊसमानही घटून ५,७२६ मिलीमीटर (२४३.४४ इंच) असे पहिल्यांदाच खालावले होते.

हेही वाचा – सांगली : विवाहितेवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा

सर्वाधिक पावसाची ठिकाणे

यंदा आजवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे असलेल्या पाथरपुंजला ७,३१० मिलीमीटर (२८७.७९ इंच) खालोखाल वाळवण (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) ६,७३८ मिलीमीटर, कोयना पाणलोटातील नवजा (ता. पाटण, जि. सातारा) येथे ६,२५० मिलीमीटर, दाजीपूर (ता, राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे ६,२०३ मिलीमीटर, निवळे (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथे ६,०२६ मिलीमीटर, कोयना पाणलोटातील महाबळेश्वर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे ५,९६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, गेल्यावर्षी सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदवलेल्या जोर (ता. वाई, जि. सातारा) येथे आतापर्यंत ५,८४० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Story img Loader