अजित पवार यांनी पवारसाहेबांना सोडून भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं दुःख मला कायम राहील, असे रोहित पवार यांनी अजित पवार यांना म्हटले आहे. अजित पवार यांनी पवारसाहेबांना सोडून भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं दुःख मला कायम राहील, असे रोहित पवार यांनी अजित पवार यांना म्हटले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीप्रमाणेच पुन्हा एकदा दोन पवारांमध्ये संघर्ष  होणार आहे आणि त्यासाठी भाजपमधून अजित पवार यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे, असे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर केल्यामुळे जामखेड मतदारसंघामध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> बिबट्याला घरात कोंडून ठेवले, कनिष्ठ न्यायालयाने सुनावली शिक्षा तर जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे केले, हा निर्णय चुकला, अशी जाहीर कबुली दिली. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्राकाकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असू शकत नाही ही आम्हाला खात्री होती. दादांनी आता ते कबूल केले आहे; मात्र मित्रपक्ष हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगत आहे. आपण चूक झाल्याचं नाव देत असलो तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्याचा दबाव होता आणि आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर आणला आहे, अशीदेखील चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> “रामदास आठवले हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार,” कोण म्हणतंय असं?

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपाचे मांडलिकत्व स्वीकारलं आणि त्यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक तुमचा पुतण्या म्हणून कायम दुःख राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पण, ही कट-कारस्थाने करणाऱ्या, तसेच महाराष्ट्र नासवणाऱ्या त्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्यातील राजकीय पटलावरून एक दिवस नक्कीच बाजूला सारेन, असा माझा तुम्हाला पक्का वादा आहे, असेदेखील रोहित पवार यांनी म्हटले आहे आणि ही पोस्ट त्यांनी अजित पवार यांनादेखील पाठवली आहे.