पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या बोली भाषेतून चौकार षटकार लगावले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भर पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये हशा पिकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “…पण विरोधी पक्ष आहे कुठे?”, मुख्यमंत्र्यांचा मिश्किल प्रश्न; म्हणाले, “आत्मविश्वास गमावलेला…”

“अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघेही विरोधी पक्षनेता होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोक आहेत. आम्ही विरोधाला विरोध केला नाही. बाळासाहेबांनी काय शिकवलं, चांगल्याला चांगलं म्हणा. तसं काम आम्ही केलं. केवळ विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. जिथे सरकार चुकतंय तिथे नक्की जाब विचारण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते. पण सध्या विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. जे जे प्रश्न येतील, जे काही आयुधांच्या माध्यमातून विचारलं जाईल, त्याला योग्य पद्धतीने न्याय देण्यात येईल”, असं अजित पवार म्हणाले.

“अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो. आणि देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंगपण करतात, विकेटपण घेतात, बॅटिंगपण करतात. चौकार, षटकार मारतात, फिल्डिंगपण चांगली करतात”, असा मिश्किल संवादही त्यांनी यावेळी साधला. त्यांच्या या वाक्यामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला होता.