विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. बुधवारी या दोघांमध्ये चर्चा झाली. मला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी बोलवलं आहे असं सांगितलं. एकनाथ शिंदे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला जात आहे. महायुती असल्याने एकनाथ शिंदे हे मला समजवण्याचा प्रयत्न करतील की बारामतीतून लढू नका. मी एकनाथ शिंदेंना इथलं वास्तव काय आहे? ते सांगायला जातो आहे. महायुतीचा हेतू आहे बारामती जिंकण्याचा. पण अजित पवारांच्या माध्यमातून ते शक्य होणार नाही असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
“अजित पवारांच्या माध्यमातून बारामती जिंकता येणार नाही. सुप्रिया सुळे बारामतीतून सहजपणे निवडून येतील. कारण अजित पवार यांच्या जाचाला आणि उर्मटपणाला बारामती जिल्हा कंटाळला आहे. आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही असं लोकच म्हणत आहेत. पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली तरीही ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात हे आता जनतेला समजलं आहे. लोकांना वाटतं आहे की यांनी आता थांबलं पाहिजे” असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.
वास्तव काय आहे ते मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे
“वास्तव काय आहे ते मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझी भूमिका ठरवेन. तूर्तास तरी मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. जनतेचा आदेश हे सांगतोय बारामतीत की आम्हाला पवार नकोत. त्यांच्या मनात काय आहे ही प्रक्रिया काय हे पाहावं लागतं. वर्षा बंगल्यात चर्चा झाल्यावर मी बोलणार आहे.” असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत.
हे पण वाचा- ‘ठाण्यातून शिंदेशाही संपवायची का?’ विजय शिवतारेंच्या आरोपानंतर अजित पवार गटाचा पलटवार
बारामती लोकसभेच्या निवडणुकीत आणखी रंगत आलीय. माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सासवडमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमतानं याबाबत निर्णय घेण्यात आला. बारामती मतदारसंघ कुणाची जहागिरी नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये. विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच आव्हान दिलं आहे. यातच आता शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले आहे. आता या चर्चेनंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.