कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाची खिडकी नसल्याने पूर्व भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट, पास काढण्यासाठी पश्चिमेत यावे लागते. बुहतांशी प्रवासी तिकीट काढून प्रवास करत असल्याने त्यांना दररोजचा हा द्रविडीप्राणायम करावा लागतो. त्यामुळे प्रवासी हैराण आहेत.

ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, अपंग यांचीही परवड होत आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे तिकीट खिडकी सुरू करावी म्हणून अनेक प्रवासी नियमित स्थानिक रेल्वे अधिकारी यांची भेट घेत आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील आयरे गाव, म्हात्रेनगर, राजाजी रस्ता, बालाजी गृहसंकुल, राज पार्क परिसरातील विस्तारित नागरीकरण भागातील रहिवासी डोंबिवली रेल्वे स्थानकात जाण्याऐवजी कोपर रेल्वे स्थानकात येऊन प्रवास करतात. बहुतांशी वर्ग नोकरदार, काही कष्टकरी वर्गातील आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
Pune City School , Student Transport Pune ,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक, ‘आरटीओ’ कारवाई करणार ?
PMP bus pune, PMP bus accident risk,
पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
visa free entry to indians
‘हा’ देश भारतीयांना देणार व्हिसाशिवाय प्रवेश; विनाव्हिसा प्रवेशाचा फायदा काय? कोणते देश ही सुविधा देतात?
Space in Ambernath for waste disposal left unused for ten years Mumbai news
१० कोटींची ओसाडभूमी ; कचरा विल्हेवाटीसाठी अंबरनाथमधील जागा दहा वर्षे विनावापर, बदलत्या तंत्रज्ञानामुळे गरजही नष्ट

हेही वाचा – ठाणे : डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा ‘पं. हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातून दररोज सुमारे २५ हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना कोपर पूर्व रेल्वे स्थानकातील अवघड जिना चढून कोपर पश्चिमेत येऊन तिकीट काढावे लागते. राजाजी रस्ता, आयरे भागातील प्रवासी कोपर रेल्वे स्थानकात कल्याण दिशेने जिना नसल्याने रेल्वे मार्गातून ये-जा करतात. तिकीट काढून लोकल पकडण्याच्या धावपळीत अनेक वेळा प्रवाशांना धावपळ करावी लागते. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडतात.

आयरे गाव-म्हात्रेनगर विभागाचे शिवसेनेचे विभागप्रमुख राहुल भगत यांनी कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या सूचनेवरून शुक्रवारी कोपर रेल्वे स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक भूषण घाणे यांना एक निवेदन दिले. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने लवकर पूर्व भागात एक तिकीट खिडकी सुरू करावी, अशी मागणी केली. ही मागणी लवकर रेल्वेच्या वरिष्ठांना कळवून तात्काळ खिडकी सुरू होईल या दिशेने प्रयत्न करण्यास स्थानक व्यवस्थापकांना भगत यांनी सांगितले.

कोपर पूर्व भागातून अनेक शाळकरी मुले पूर्व पश्चिम ये-जा करतात. गर्भवती महिलांना ये-जा करताना त्रास होतो. कोपर रेल्वे स्थानकातील ही गैरसोय विचारात घेऊन अनेक प्रवासी इच्छा असूनही कोपर स्थानकात न येता गर्दीच्या डोंबिवली स्थानकात जाऊन प्रवास सुरू करतात, असे विभागप्रमुख राहुल भगत यांनी सांगितले.

स्थानक व्यवस्थापक भूषण घाणे यांना निवेदन देताना कल्याण डोंबिवली संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे, उपशहर संघटक हरिश्चंद्र पराडकर, विभाग प्रमुख राहुल भगत, शाखाप्रमुख राकेश राणे उपस्थित होते.

हेही वाचा – ठाणे : कल्याण जवळ ५६ लाखांचा बनावट विदेशी दारूचा बनावट साठा जप्त

“ कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात तिकीट खिडकी सुरू करण्यात जागेची अडचण आहे. तरी या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तिकीट खिडकीचे नियोजन सुरू आहे. दिवा-वसई मार्गावरील गर्दी वाढल्याने तळ आणि उन्नत कोपर स्थानकादरम्यान पादचारी पूल बांधणीचे काम सुरू आहे. या पुलाच्या मध्यवर्ति ठिकाणी तिकीट खिडकीचे नियोजन आहे. या खिडकीमुळे कोपर पूर्व भागातील प्रवाशांचाही सोय होणार आहे.” असे कोपर रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक भूषण घाणे म्हणाले.

“कोपर पूर्व रेल्वे स्थानकातून दररोज २५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पूर्व भागातील प्रवाशांना तिकीटासाठी दररोज पश्चिमेत जावे लागते. लवकरात लवकर पूर्व भागात उपलब्ध जागेत तिकीट खिडकी सुरू करावी, अशी मागणी केली आहे,” असे शिवसेना विभागप्रमुख राहुल भगत म्हणाले.

राहुल भगत
विभागप्रमुख
शिवसेना

फोटो ओळ

Story img Loader