गेल्या पंधरा दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आणाजे (ता.राधानगरी) येथील शेतकरी ग्रामस्थांनी पाच हजाराचा निधी गोळा करून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले,की महाराष्ट्रातल्या शेतकऱयांना उसाची पहिली उचल 3000 रु पये मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलने केली.त्या वेळी गरीब शेतकऱयांना पोलिसांनी मारहाण व गोळीबार केला.त्यामध्ये दोन शेतकरी मयत झाले.त्याची सीबीआय चौकशी करावी.या वेळी या घटनेचा निषेध करण्यात आला व शासनातर्फे त्या कुटुंबाना भरीव मदत मिळावी अशी मागणी केली.या वेळी बाळासो भांदिगरे,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गोजारे,शिवाजी पाटील,डी.जी.टेपुगडे,दत्तात्रय तिबीले,साताप्पा पाटील,लक्ष्मण तिबिले व अण्णा जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक युवराज भांदिगरे तर आभार गणेश पाटील यांनी मानले.