सोलापूर : राज्यात आणि देशात भाजपाच्या विरोधात जनतेला सत्ताबदल हवा आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आता सर्व विरोधकांनीही एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. त्यादृष्टीने विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

सोलापूरच्या दोन दिवसांच्या भेटीला आल्यानंतर पवार यांनी सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीसह महाविकास आघाडीचे ऐक्य, कोकणातील बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्प, मोदी सरकारचे शेतीविषयक धोरण आणि स्वतः पक्षाध्यक्षपदावरून घेतलेली निवृत्ती मागे घेणे आदी मुद्यांवर मते मांडली.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

हेही वाचा – स्नेहल जगतापांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाना पटोले उद्धव ठाकरेंवर नाराज? म्हणाले, “महाविकास आघाडीत काँग्रेसला…”

पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाध्यक्षपदावरून आपण घेतलेली निवृत्ती पक्षकार्यकर्त्यांसाठी मागे घेतली. पुढील वर्षापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण अध्यक्षपदी राहणार आहोत. कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार आताच करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात, शरद पवार यांचा राजकीय वारसदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे नेणारे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, आशी टीका करण्यात आली आहे. त्यावर लक्ष वेधले आसता पवार यांनी सावध भूमिका घेत थेट उत्तर देण्याचे टाळले.

हा अग्रलेख आपण वाचला नाही. वाचल्यानंतर त्यावर भाष्य करणे उचित ठरेल. सामना वृत्तपत्र महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष चालविणाऱ्या नेत्यांचे आहे. महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम करतो. सामनाचा अग्रलेख महाविकास आघाडीच्या ऐक्याला पोषक ठरेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात ५ हजारांहून अधिक मुली हरवल्याची रुपाली चाकणकरांची माहिती

महाविकास आघाडीने ऐक्याची मूठ बांधली आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या खोट्या बातम्या सोडणे बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांना कान पिचक्याही दिल्या. शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर व्हावा म्हणून काहीजणांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी, देव पाण्यात ठेवण्याचे काम भाजपाशिवाय अन्य कोण करणार, असा टोला मिश्किलपणे लगावला.

कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी महाविकास आघाडी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारात उतरले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी महाराष्ट्रातील नेत्यांनी उभे राहणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.