सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करून निषेध करणार्‍या कार्यकर्त्याची सांगलीमध्ये २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणुक काढून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दिली.

हेही वाचा… शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाउराव पाटील यांच्या अतुलनीय शैक्षणिक कार्याबद्दल अपशब्द वापरणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून निषेध केला. या घटनेमुळे मूलतत्ववादी विचारांना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असून शाई फेक करणारे मनोज गडबडे व या घटनेचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची सांगलीत २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही मिरवणुक सुरू होणार असून लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.यानंतर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा… ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत; आमदार राजन साळवींची एसीबीकडून चौकशी

गडबडे, वाकडे याच्याबरोबरच विक्रम होवाळ, आकाश इजद यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रा.कांबळे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज सांगलीत बैठक पार पडली. या बैठकीस नंदकुमार भंडारे, संदीप ठोंबरे, वीरू फाळके, अशोक वायदंडे आदी उपस्थित होते.