गोपीनाथ मुंडे जनसामान्यांचे नेते होते. सातारकरांशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांच्या स्नेहाची उणीव कायम राहील अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या.
सातारा येथील मोती चौकात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भरतीय जनता पक्ष, शिवसेनेचे कार्यकत्रे उपस्थित होते.
या सभेत श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी लिहिलेल्या शोकपत्राचे वाचन करण्यात आले. पत्रात गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकाराणात, समाजकारणात तसेच आम्हा कुटुंबाशी त्यांचे असलेल्या स्नेहसंबंधामुळे पोकळी निर्माण झाली आहे, हे नुकसान भरून न येणारे आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील,गोपाळशेठ, दीपक पवार आदी मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान सातारा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तुरळक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. बाजारपेठेत शुकशुकाट होता. खासगी वाहने तसेच परिवहन महामंडळाची वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.

Story img Loader