मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच एका इसमाने आज (६ ऑक्टोबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. “ओबीसी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे”, अशी घोषणा देत त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न झाला केला. दरम्यान, वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला असून आता पोलिसांकडून तातडीने सदर इसमाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Story img Loader