व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांचा शेवट विचित्र असतो. अशी भूमिका लोकशाहीला मारक असते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी शहर (जिल्हा) काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित ‘वचनपूर्ती’ मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
काँग्रेसने भरपूर विकासकामे केली असून ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन कार्यरत राहणे आवश्यक आहे. निवडणूक म्हणजे वैचारिक लढाई. या लढाईला तोंड दिले पाहिजे. मैदान सोडता कामा नये, असा उपदेशही चव्हाण यांनी केला. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेंतर्गत नांदेडमध्ये अनेक विकासकामे करण्यात आली. घरे बांधण्यात आली. नांदेडमध्ये जे होऊ शकते ते नाशिकमध्ये का होऊ शकले नाही, असा सवालही त्यांनी केला. नाशिकच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून जर काम होत नसेल तर बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी त्यांच्याविरुद्ध मोर्चेही काढावेत, असे आवाहन चव्हाण यांनी केले. काँग्रेसची इच्छा मित्रपक्षाबरोबर निवडणूक लढविण्याची असली तरी काही जिल्ह्य़ांमध्ये मित्र हा शत्रूसारखा वागू लागला की काय, असे वाटण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळेच ऐन वेळी मित्राने जर साथ सोडली तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला. दुष्काळाचे कोणी राजकारण करू नये. दुष्काळग्रस्त भागाचा दौरा मदतीसाठी न करता केवळ सरकारवर द्वेषारोप करण्याकरिता होत असेल तर ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले. या वेळी आ. शरद रणपिसे, आ. जयप्रकाश छाजेड, बसवराज पाटील, सत्यजीत गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप लोकशाहीला मारक -अशोक चव्हाण
व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांचा शेवट विचित्र असतो. अशी भूमिका लोकशाहीला मारक असते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी शहर (जिल्हा) काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित ‘वचनपूर्ती’ मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
First published on: 25-03-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personal charge countercharge killing for democracy ashok chawhan