गेल्या काही वर्षांत राज्यात काका-पुतण्यांचं राजकारण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर या काका-पुतण्याच्या राजकारणाची चर्चा चालू झाली. यावरूनच, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून टीका केली आहे. आज राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एखाद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी खालच्या दर्जाला राजकारण गेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी थांबलेलं बरं असं अनेकांना वाटतं. किती गुंडगिरी महाराष्ट्रातील राजकारणात शिरते आहे, याची अनेक उदाहारणं गेल्या काही महिन्यांत दिसायला लागली आहेत. माझी लातूरकरांना विनंती आहे की, या लातूरने महाराष्ट्रातील काँग्रेसला सतत तेज देण्याचं काम केलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात ठामपणे अस्तित्वात आहे, हे अनेकवेळा या लातूरने सिद्ध करून दाखवलं आहे. लातूरकरांवर ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रात ज्या संस्कृतीत वाढलो, जी संस्कृती विलास देशमुखांनी दाखवली, ती संस्कृती लोप पावत आहे. या लोप पावणाऱ्या या संस्कृतीला टिकवण्याचं काम लातूरकरांचं आहे”,असं भावनिक आवाहन जयंत पाटलांनी केलं.

हेही वाचा >> “विलासराव देशमुख असते तर काँग्रेसची…”, काँग्रेसच्या भवितव्याबाबत विश्वजीत कदमांचे मोठे विधान

काँग्रेससाठी काका-पुतण्याचं नातं धार्जिणं

“काँग्रेसचं बरं आहे काका-पुतण्याचं नातं धार्जिणं दिसत आहे. दिलीप देशमुख उत्तमपणाने नेतृत्त्व करत आहेत. अमित यांच्यासह सर्वांचे संबंध मधूर आहेत. राजकारणात कसंही कोणी वागलं तरी चालतं. पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. आता त्याही गोष्टी व्हायला लागल्या आहेत”, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.

“काँग्रेसमधील दिलीप देशमुखांच्या मागे सक्षम आणि खंबीरपणाने राहणारा नेता अमित देशमुखांच्या रुपाने भेटला आहे. पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या पीढीच्या नंतरची पिढी म्हणून सतेज पाटील आहेत”, असंही जयंत पाटील म्हणाले.

विलासराव देशमुखांमुले काँग्रेस अधिक संपन्न

“आज विलासराव देशमुख असते तर काँग्रेस अधिक संपन्न आणि सामर्थ्यवान झाली असती. विलासरावांनी सक्षम आणि भक्कम काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती. काँग्रेस विलासरावांच्या नेतृत्त्वामुळेच होती. विलासराव देशमुखांना महाराष्ट्रातील खडान् खडा माहिती होती”, असंही ते म्हणाले.

“लोक एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज स्व. विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे”, असे कौतुकग्दारही त्यांनी उद्गारले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personal relationship should not be broken for political reasons jayant patil statement on uncle nephew relationship in congress sgk