Petrol-Diesel Price In Maharashtra: आज २० ऑगस्ट २०२४ रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करत असतात. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे दर काय आहेत हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel ) नवे दर :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०३.३५ | ९०.८७ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०५.३१ | ९१.८० |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८२ | ९२.३० |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.४१ |
चंद्रपूर | १०४.४४ | ९१.०० |
धुळे | १०४.६१ | ९१.१३ |
गडचिरोली | १०५.१६ | ९१.६९ |
गोंदिया | १०५.५९ | ९२.०९ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.१४ | ९१.०६ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.३९ | ९०.९४ |
लातूर | १०५.२९ | ९१.८० |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९६ | ९०.५४ |
नांदेड | १०६.२४ | ९२.७१ |
नंदुरबार | १०५.१७ | ९१.६७ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०३.९७ | ९०.४८ |
परभणी | १०६.४१ | ९२.८६ |
पुणे | १०३.८८ | ९०.४१ |
रायगड | १०३.८९ | ९०.४० |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४८ | ९१.०२ |
सातारा | १०५.०७ | ९१.५६ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०३.५१ | ९०.०३ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०४.९५ | ९१.४८ |
महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel )दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर करतात आणि हे नागरिकांपर्यंत पोहचवतात. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही सुद्धा इंधनाचे दर तपासून घ्या.
महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, गोंदिया, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, पालघर, रायगड, सांगली, सातारा या शहरांत पेट्रोलच्या किंमतीत किंचित बदल पाहायला मिळाला आहे. तर अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सांगली, सातारा आदी शहरांत पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, पालघर या शहरांत डिझेलच्या किंमतीत दरवाढ तर अमरावती, जळगाव, परभणी, वर्धा या शहरांत डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.
सर्व्हिसिंगची (Bike Service) योग्य वेळ कशी ओळखायची यासाठी सोप्या ट्रिक्स :
नव्या बाईकवर सुरुवातीला इंजिनबरोबर त्याच्या इतर पार्ट्सवरदेखील जास्त दबाव पडत असतो. बाईकची योग्य वेळी सर्व्हिसिंग (Bike Service) केल्याने इंजिनाचे आयुष्य वाढण्यास आणि तिची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यास मदत होते. साधारणपणे एक चांगला नियम म्हणजे दर ३,००० ते ५,००० किलोमीटरनंतर किंवा दर सहा महिन्यांनी एकदा सर्व्हिसिंग करून घेणे. सर्व्हिसिंगदरम्यान, इंजिन ऑइल, एअर फिल्टर, स्पार्क प्लग व चेन तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची बाईक नेहमीच चांगली राहील.