Petrol Diesel Price In Maharashtra : आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे इंधनाचा भाव वाढला की बजेटवर परिणाम तर इंधनाचा भाव कमी झाला की सामान्य नागरिकांचा आनंद गगनात मावत नाही. तर आजचे दर पाहता पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहेत.
पेट्रोल-डिझेलचा आजचा दर (Petrol Diesel Price)
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.५९ | ९१.४० |
अकोला | १०४.२२ | ९०.६८ |
अमरावती | १०४.८० | ९१.३७ |
औरंगाबाद | १०५.५० | ९२.०३ |
भंडारा | १०५.०८ | ९१.६१ |
बीड | १०४.४९ | ९१.३३ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.९० |
चंद्रपूर | १०४.१० | ९०.६७ |
धुळे | १०४.६२ | ९१.१० |
गडचिरोली | १०५.०० | ९१.५७ |
गोंदिया | १०५.५० | ९१.९५ |
हिंगोली | १०५.१६ | ९२.०३ |
जळगाव | १०५.२० | ९१.२३ |
जालना | १०५.३० | ९२.०३ |
कोल्हापूर | १०४.१४ | ९०.६६ |
लातूर | १०५.४२ | ९१.८३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.०५ | ९०.६५ |
नांदेड | १०५.४९ | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.८१ | ९१.४८ |
नाशिक | १०४.४० | ९१.०७ |
उस्मानाबाद | १०४.७८ | ९१.८५ |
पालघर | १०३.७५ | ९०.७३ |
परभणी | १०५.५० | ९२.०३ |
पुणे | १०४.१४ | ९०.८८ |
रायगड | १०३.९६ | ९०.६२ |
रत्नागिरी | १०३.९६ | ९१.९६ |
सांगली | १०४.४८ | ९०.७९ |
सातारा | १०४.७६ | ९१.२५ |
सिंधुदुर्ग | १०५.५० | ९२.०३ |
सोलापूर | १०५.१० | ९१.२३ |
ठाणे | १०३.६८ | ९०.२० |
वर्धा | १०४.८० | ९१.४४ |
वाशिम | १०५.०५ | ९१.४३ |
यवतमाळ | १०५.५० | ९२.०३ |
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
घरबसल्या चेक करा नवे दर (Petrol Diesel Price) :
बदलत्या काळात अनेक गोष्टी डिजिटल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या सुद्धा पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
सेकंड हॅण्ड कार घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर कशी घ्यायची काळजी?
सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी त्याचप्रमाणे गाडी खरेदी केल्यानंतरही वर्षानुवर्षे गाडीचे नुकसान होणार नाही यासाठी काही गोष्टी जाणून घेणेसुद्धा महत्त्वाचे असते.
१. सर्व्हिस हिस्ट्री इन्स्पेक्शन (Service History Inspection)
कारच्या सर्व्हिस रेकॉर्डस् व ओनरशिप हिस्ट्रीचे पुनरावलोकन करणे, गाडीची स्थिती समजून घेणे या बाबी गाडीसंबंधित आधीच्या कोणत्या समस्या आहेत का हे ओळखण्यास मदत करतात अधिकृत डीलरकडून व्हेरिफाईड रेकॉर्ड प्रदान केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ- योग्य देखभाल ही बाब वाहनाच्या मेंटेनन्समध्ये कोणतेही अंतर नाही ना याबद्दलचा विश्वास प्रदान करतो.
२. इंजिन आणि ट्रान्स्मिशन केअर
इंजिनाला वाहनाचे हृदय, असे संबोधले जाते. कारण- इंजिन गाडीच्या हालचालींना सामर्थ्य देते. त्यामुळे इंजिन सुरळीत चालते आहे ना हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित फिटनेस तपासणी करणे आवश्यक आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी इंजिनामध्ये योग्य वायुप्रवाह सुनिश्चित करण्यासाठी दर १५ ते ३९ किमी (15k to 30k) मैलांवर एअर फिल्टर बदला. गाडीचा टायमिंग बेल्ट किंवा चेन बदलण्यासाठी मॅन्युफॅक्चरर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि नियमितपणे इंजिन ऑईल बदला.